Dakshin Bharat Jain Sabha's - Pragati Ani Jinvijay :: 13 august 2010 :: Issu 28
शांतीसागर वाणी
सहर्ष अणि संघर्ष
काही गोष्टी लोक अतिशय आनंदाने करीत असतात. तर काही गोष्टीसाठी संघर्षही करावा लागतो. आपल्या कार्यसिद्दीसाठी लोक विविध प्रकारे प्रयत्न करीत असतात. कार्यातील अडथळे सहर्षपने स्वीकारणारे नेहमीच आनंदात असतात. खूपवेळा अनादिवृतीच कार्यपुर्तीसाठी कारणीभूत ठरत असते. सहर्षपाने झालेले आणि केलेले कार्य एकमेकात कटुता निर्माण करत नाही. भाविश्यातीन निर्विघ्न कार्यपुर्तीसाठी नेहमी सहर्ष सहयोग अथवा योगदान देणे हे प्रत्येकाच्या फायद्याचे ठरते. मित्र असो कि वैरी प्रत्येकाशी असणारा आपला व्यवहार हा हर्षयुक्तच असायला हवा. हर्षयुक्त व्यवहारामुळे नाती जपली जातात. संघर्ष्यामुळे नात्यात नेहमी दुरावाच निर्माण होतो. बिकट परिस्तिथी संघर्ष करणे याचा अर्थ सर्वाशी संघर्ष करणे असा होत नाही. प्रतिकूल परिस्थितीत आपली सभ्यता टिकवून ठेवून कार्य्पुर्तीची वात पाहणे म्हणजे परिस्थितीचा संघर्ष करणे होय. काही वेळा आपली वृत्ती संघर्षाची होवून बसते. अहंकाराची परिसीमा वाढली की, जीवन संघर्षमए होऊ लागते. प्रत्येक गोष्टीत आणि प्रत्येकाशी संघर्ष सुरु होतो. संघर्ष्यातून आपुलकीचे घर्षण खूप झाल्यामुळे आपलेपणा निघून जातो. नंतर उरतो तो कोरडा व्यवहार. आपल्याला जितका संघर्ष टाळता येईल, तेवढा टाळावा. संघर्षामुळे वातावरणात गरमपणा निर्माण होतो. हा गरमपणा माणुसकीचा ओलावा नाहीसा करणारा ठरतो. संघर्षातून जरी काही आपल्या स्वार्थाची पुरती झाली तरी जीवनातील हर्ष कमी झाल्यामुळे आपणास एकाकी होवून जगावे लागते. संघर्ष सोडून प्रत्येकाने सहर्षतेचा स्वीकार करायला शिकले पाहिजे. यामुळे सभोवती आल्हाददाइ वातावरणाची निर्मिती होऊ शकेल.
ब. ब्र. संजयजी गोपालकर
============================== ========================= =============
भ. महावीर अध्यासन : एक सिहावलोकन
प्रात:स्मरणीय आचार्य कुन्द्कुन्दाचे एक खूप प्रसिद्ध वाचन आहे.- "नाणं नारस्स सारं !" अर्थात ज्ञान हेच मनुष्य जीवनाचे सार आहे. मग हे ज्ञान मिळवायचे कशासाठी असा प्रश्न उपस्थित होतो. आजकाल ज्ञान हे केवळ आर्थिक कामैसाठी, भरपूर पैसे मिलवून देणाऱ्या नोकरीच्या प्राप्तीसाठीच घ्यायचे असते असा पोटार्थी सिद्धांत रूढ झाला आहे. पण जैन तत्वज्ञान असे सांगते कि ज्ञान हे स्वताला अधिक उन्नत, अधिक उज्वल करून उत्तुन्गते पर्यंत पोहोचण्यासाठी प्राप्त करायचे असते. म्हणूनच ज्ञानप्राप्तीसाठी वयाचा अडसर मानला जात नाही. ज्ञानाचा आस्वाद घेवून स्वतः बरोबरच दुसर्याचे जीवनही प्रसंन्न, आनंदी आणि समृद्ध करावे हि अपेक्षाही काही गैर मानता येणार नाही. ज्ञानाची आणि ज्ञानार्जनाची हि सारी महती आता कथन करण्यास कारण घडले ते कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाच्या भ. महावीर अध्यासन केंद्राची !
अलीकडेच भ. महावीर अध्यासनाच्या समन्वयक दर. सौ. पद्मजा पाटील यांची भेट झाली. निमित्त होते ते " एम ए जैनालाजी" या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यापुढील अडचणीतून मार्ग काढण्यासाठी मा. कुलगुरूबरोबर आयोजित केलेल्या बैठकीचे स्वताची कौटुंबिक जबाबदारी समर्थपने पेलून, स्वताच्या विषयातील अध्यापनाचे नि संशोधनाचे व्याप सांभाळून पद्मजाताई ज्या निष्ठेने, ज्या द्यासाने नि क्रीयाशिलतेने अध्यासनाच्या "समन्वयका" ची भूमिका निभावत आहेत. त्याचे मनापासून कौतुकच करायला हवे. यामागे त्यांची स्वताची जैन साहित्य, जैन संस्कृती व जैन तत्वज्ञाना संबधीची ज्ञानलालसा हे जरी असले तरी ज्यातून आर्थिक फायदा काडीमात्र न होता शारीरिक व बौधीक्श्रम मात्र भरपूर होतात अशा कामासाठी वेळ देण्याची वृत्ती आजकाल आढळतेच कुठे ? नि आढळली तरी अपवादात्मकच असते, या निमित्ताने भ. महावीर अध्यासनाचे "शिहावलोकन" केले तर ते औचित्यपूर्ण ठरेल. एप्रिल २००१ ते एप्रिल २००२ हे भ. महावीरांचे २६०० वर्षे पूर्ण होणारे जयंती वर्ष साजरे झाले तेव्हा दक्षिण भारत जैन सभेने शिवाजी विद्यापीठात भ. महावीर अद्यासानाची स्थापना करण्याची मागणी केली. तेव्हा कुल्गुरुनी गठीत केलेल्या समितीने अध्यासन स्थापनेचा आराखडा तयार केले नि कुलगुरू प्रा. ताकवले यांनी शासनाकडे अध्यासन निर्मितीसाठी आर्थिक मदतीचा प्रस्ताव पाठविला. तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुखांनी २५ एप्रिल २००२ च्या महावीर जन्मकल्यानक महोत्सवात ऑगस्ट क्रांती मैदानात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना हजारोंच्या उपस्थितीत भ. महावीर अध्यासनासाठी शासनाकडून २५ लाख रुपये मदत म्हणून देण्याची घोषणा केली व त्याप्रमाणे मे २००३ मध्ये २५ लाख रुपये मिळालेही. नंतर विद्यापीठीय औपचारिकता पूर्ण होऊन २००४ मध्ये म्यानेजमेंट
कौन्सिलच्या ठरावानुसार अध्यासनास मान्यता मिळाली व निधी संकलनाचे काम जोमाने चालू झाले. शासनाच्या २५ लाखामध्ये यु. जी. सी. चे. व देणगी रूपाने गोळा झालेले सर्व मिळून आता जवळपास २५ ते ५० लाख रुपयांचा निधी गोळा झाला तर अद्याप ५५ ते ६० लाख रुपयांची गरज अजूनही आहेच. प्रारंभी प्रोफ. आर. बी. पाटील, नंतर प्रोफ. बी. दि. खाणे यांनी समन्वयक म्हणून काम केले. या अध्यासनासाठी निधी गोळा करण्यात व शासनाकडून आर्थिक मदत मिळविण्यासाठी मा. कल्लाप्पांना आवाडे (दादा), प्रकाश आवाडे, प्रोफ. डी. ए. पाटील, माजी कुलगुरू प्रोफ. ताकवले, डॉ. सुभाषचंद्र अक्कोळे, प्राचार्य श्रीधर हेरवाडे यासारख्या ज्ञान तपस्व्यानी कित्येक दानशूर व्यक्तींना अध्यासानाला देणगी देण्यास प्रवृत्त कसे केले हे आम्ही अनुभवले आहे. कुलगुरू डॉक्टर माणिकराव साळुंखे यांच्या कारकिर्दीत अध्यासनाच्या कार्यास खर्या अर्थाने गती मिळाली. जेव्हा एक कोटीचे निधी संकलन पूर्णत्वास जाईल तेव्हा तिच्या व्याजातून भ. महावीर अध्यासनाचे कार्य निर्विघ्नपने शास्वत स्वरुपात चालेल याची ग्वाहीही डॉ.पद्मजा पाटील यांनी दिली. आजवर अध्यासनातर्फे " दखनच्या जैन विद्या संशोधनाचे प्रायाम, महाराष्ट्रातील जैन तीर्थक्षेत्रे - सामाजिक- आर्थिक- ऐतिहासिक अभ्यास" व संतकवी ब्रह्ममहतीसागर - साहित्यसमालोचन अशी चर्चासत्रे आयोजित केली गेली. " सल्लेखना" या विषयावरचे डी. ८ व ९ मार्चचे २ दिवसाचे चर्चासत्र केवळ अपूर्व असेच होते. सल्लेखनेविषयी सखोल चर्चा होवून सांगोपांग विचार अभ्यासकांनी मांडले. अध्यासानाकडून विद्वानांनी झालेली हि अत्यंत महत्वाची उपलब्धी होती. शिवाय अध्यासनातर्फे विद्यापीठात व अन्य ठिकाणी डॉ. जयकुमार उपाध्ये, नवी दिल्ली, क्रांतिकारी संत तरुणसागर महाराज, डॉ.उदिता शहा मुंबई, डॉ. व्ही. एम. धारूरकर, डॉ. वाचस्पती उपाध्याय नवी दिल्ली या विद्वान जैन साहित्तीकांची व्याखानेसुद्धा आयोजित केली गेली. एकंदरीत अद्यासनातर्फे भरीव काम झाले आहे- होत आहे.
या निमित्ताने भ. महावीर अध्यासनाचे "शिहाव्लोकन' करताना ज्यांचे रूढार्थाने शिकण्याचे वय उलटून गेले तरीही, जैन तत्वज्ञान समजून घेण्याची चिकाटी, जिद्द जीवनिष्ठा असणारे बाहुबली पाटील यांच्यासारखे विद्यार्थी एम.ए. जैनालोजीचा अट्टाहास करतात. त्याबद्दल त्यांचे व त्यांच्या सहकार्यांचे अन्तःकरणपूर्वक अभिनंदनच केले पाहिजे. कारण या पदवीमुळे या मंडळीना नोकरी मिळण्याची शक्यता नाही वा असलेल्या नोकरीत पगारवाढही मिळणार नाही, पेन्शनही मिळणार नाही. पण हि सारी मंडळी समाज्याच्या अणुरेणूत स्पुर्ठीची बीजे पेरण्याचे काम निश्चितपने करणार आहेत हे विसरता कामा नाये. भ. महावीर अध्यासनाच्या माध्यमातून विद्यापीठाचे एक भव्य स्वताचा जागेतले "जैनालोजी रिसर्च सेंटर" उभे राहावे जे सर्वार्थाने सुसज्ज असेल हे डॉ. पद्मजा पाटील यांचे स्वप्न "शिहावलोकन" करताना केवळ स्वप्नच राहू नये याची दक्षता भविष्यात घेतली पाहिजे. कारण सिंह मोठ्या ऐटीत - रुबाबात चालत असताना मागे बगत थांबत नाही तर नजर बदलून पुन्हा पुढची वाटचाल चालू करतो. सिहांची हि वृत्ती सिहाव्लोकन करताना विसरता कामा नये हि सदिछ्या मनी बाळगून "प्रगती" परिवार अध्यासनास व समस्त समाज्यास येत्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेछ्या सुद्धा देत आहे.
डॉ.महावीर अक्कोळे
#########################################################
बातमी ........
दक्षिण भारत जैन सभेच्या अध्यक्षपदी
रावसाहेब पाटिल (बोरगावकर)
श्री रावसाहेब पाटिल यांचा सत्कार करताना विद्यमान अध्यक्ष आदरणीय श्री. काल्लाप्पांना आवाडे (दादा) सोबत जीवंधर चौगुले, प्रोफ. डी. ए. पाटील, सागर चौगुले, सुरेंद्र मिनचे (सावकार) आदि मान्यवर
------------------------------------------------------------------------------------------------------
दक्षिण भारत जैन सभेच्या सन २०१०-१३ या कालावधीकरिता अध्यक्ष म्हणून श्री. रावसाहेब पाटील (बोरगावकर) यांची एकमताने निवड झाली. सांगली येथे डी. ८ ऑगस्ट २०१० रोजी झालेल्या मद्यवरती कार्यकारी मंडळाच्या बैठकीत हा महत्वपूर्ण निर्णय झाला. सभेचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय श्री. काल्लाप्पाना आवाडे (दादा) यांच्या अध्यक्षतेखाली सदा बैठक संपन्न झाली.
श्री. रावसाहेब पाटील हे दक्षिण भारत जैन सभेचे गेली ८ वर्षे व्हा. चेअरमन म्हणून काम पाहत आहेत. बोरगाव येथील श्री अरिहंत क्रेडीट सौहार्द सहकारी ली. बोरगाव व अहिहंत उद्योग व शैक्षणिक संकुलाचे संस्थापक अध्यक्ष म्हणून त्यांनी भरीव कामगिरी केली आहे. विविध धार्मिक, सामाजिक व राजकीय क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमठविणारे श्री. रावसाहेब पाटील यांच्या या निवडीने सर्वत्र आनंद व समाधान व्यक्त होत आहे. विद्यमान अध्यक्ष श्री. काल्लाप्पांना आवाडे (दादा) यांनी पुढील कालावधीकरिता अध्यक्षपदासाठी श्री. रावसाहेब पाटील (बोरगावकर) यांचे नाव सुचविले. त्यास मुख्यमंत्री सागर चौगुले यांनी अनुमोदन दिले. त्यांच्या या निवडीबद्दल त्यांनी त्यांच्या पुढील कार्यास दक्षिण भारत जैन सभा व परिवार तर्फे मनःपूर्वक हार्दिक शुभेछ्या !
#########################################################
No comments:
Post a Comment