Wednesday, September 1, 2010

Dakshin Bharat Jain Sabha's
Pragati ani Jinvijay
-------------------------------------------------------------------------------
Est.1902, issu dt.27 august 2010 issu no.29
-------------------------------------------------------------------------------

शांतीसागर वाणी

अज्ञ आणि तद्न्य

माहितीचा अभाव असणाऱ्या व्यक्तीला अज्ञ मानले जाते. जीवाच्या ज्ञानाचा अभाव तर कधीच होत नाही. परंतु जोपर्यंत जीव संसारी अवस्थेत असतो. तोपर्यंत त्याला चाद्म्स्थ  म्हंटले  जाते. मती -श्रुत  ज्ञानामुळे  अनेक
संसारी जीवना  अज्ञ्पणा  असतोच  असतो. काही गोष्टींची माहिती आखाड्याला अधिक  झाली की, त्याला  त्यातिल  तद्न्य म्हंटले जाते. सर्व विषयातील खरे तद्न्य  तर सर्व्द्नच  असतात. परंतु पार्यायमूढ   जीव स्वताला अनेकवेळा सर्वच विषयात तद्न्य समजू लागतो. त्याची अशी समजूत त्याला त्याच्या संसारी परीभ्रमनाला कारणीभूत होत असते. सर्वज्ञांच्या अभावात आपण अज्ञच आहोत. आपला अज्ञपणा आपण स्वीकारला पाहिजे. अहंकार अज्ञपनाला स्वीकारू देत नाही. अनेक गोष्टीत आपण तद्न्य आहोत हि भावना आपल्याला गर्विष्ठ बनवण्यात कारणीभूत ठरते. अज्ञ असूनही आपणाला आपण तद्न्य मानल्यामुळे अनेक गोष्टींचा विपर्यास होवून विवादाचे प्रसंग उत्पन्न होतात. एखादी व्यक्ती एका गोष्टीत तद्न्य असेल तर ती दुसऱ्या कोणत्यातरी गोष्टीत अज्ञ असतेच. माहितीचा कमी अधिकपणा किंवा माहितीचा खरे खोटेपणा आपल्याला भ्रमित करू शकतो. त्यामुळे आपण नेहमी माहितीवर विश्वास न ठेवता ज्ञानावर विश्वास ठेवावा. आपली जनण्याची प्रक्रिया कशी झाली आहे. माहिती आपल्यापर्यंत कश्याप्रकारे पोहोचली आहे. ती आपल्याला कोणी पोहोचविली आहे यावर माहितीचे खरेखोटेपण अवलंबून असते. आपण अज्ञ असताना स्वताला तद्न्य समजून कोणतीही गोष्ट करू नका. एखाद्या विषयात तद्न्य असाल तर आपण आणखी कोणत्या गोष्टीत अज्ञ आहोत याचा शोध जरूर घ्या. आपले अज्ञपण जाणण्याचे तद्न्यपण जोपर्यंत आपल्यात येत नाही तोपर्यंत आपण भ्रमित अवस्थेत जी गोष्ट कराल त्याला मूर्खपानच मानण्यात येईल. जन्मजात कोणीही तद्न्य असत नाही. खूप प्रयासाने स्वतःला तद्न्य बनवावे लागते.
ब. ब्र. संजयजी गोपलकर
===========================================संपादकीय 

धर्म सभेची यशस्वी फलश्रुति

दक्षिण  भारत  जैन सभा, दक्षिण भारत जैन उपाध्याय समिती आणि समस्त दिगंबर जैन समाज, इचलकरंजी यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार दि. १० ऑगस्ट २०१० रोजी राजीव गांधी सांस्कृतिक भवन, इचलकरंजी येथे, जैन धर्मीय समन्वय धर्मसभेचे, अतिशय उत्तमरीतीने आयोजन करण्यात आले होते. या धर्मसभेसाठी दक्षिण महाराष्ट्र व उत्तर कर्नाटकातील  जैन समाजाचे व संस्थांचे प्रतिनिधी आणि वेगवेगळ्या गोच्या जीन्मान्दिराचे ट्रस्टी, पदाधिकारी, श्रावक-श्राविका प्रचंड संखेने उपस्थित होते. अध्यक्षस्थानी द. भा. जैन सभेचे अध्यक्ष, माजी खासदार श्री. काल्लाप्पांना आवाडे (दादा) होते.

अशा प्रकारच्या धर्मसभेची आवशकता का वाटली ? याचे तात्कालिक कारण, चातुर्मासानिमित्त इचलकरंजी येथे आलेल्या, दिगंबर जैन मुनीच्या बाबतीत असले तरी गेले अनेक दिवस सांगली, कोल्हापूर, बेलगाम या जिल्हा परिसरात, अगदी पूर्वीपासून एकत्रितपणे प्राचीन जैन परंपरा, श्रद्धेने सांभाळत असणाऱ्या, जैन समाजामध्ये विघटन करण्याचे काम सुरु आहे. वास्तविक ज्या मुनींनी - आचार्यांनी साधू संतानी, आपल्या धर्मोपदेशाने समाज संघटनाच काम करायला पाहिजे, त्यांनीच मुलभूत धार्मिक आचार- विचारामध्ये, अभिषेक- पूजा प्रकारामध्ये, जे बदल घडवून आणले आहेत आणि श्रावक- श्राविकांच्या मनात संभ्रम निर्माण करून, समाज विघ्तानांचे काम सुरु केले आहे; ते त्यांनी ताबडतोब थांबवावे; अशी आम्ही त्यांना आग्रहाची विनंती करतो. या धर्मसभेमध्येसुद्धा सर्वांचे म्हणणे आणि मागणे हेच होते.

दक्षिण भारतातील सर्व दिगंबर जैन मंदिरात, प्राचीन काळापासून चालत आलेल्या, आर्ष (रुशीप्रनित) परंपरेनुसार भगवंतावर पंचामृत अभिषेक व पुजाष्टक ई. करण्याचा आणि ब्रह्मदेवादी क्षेत्रपाल तथा धर्नेद्र - पद्मावती इ. यक्ष- याक्षिनिंचा मन- सन्मान, पूर्वीप्रमाणेच ठेवण्याचा अत्यंत महत्वपूर्ण असा निर्णय, दिगंबर जैन समाज समन्वय धर्मसभेमध्ये, सर्वानुमते घेण्यात आला; यामुळे लोकांच्या मनात तो संभ्रम होता- तो दूर झाला आणि हा संदेश गावोगावी पोहोचला. या धर्मसभेची हि फार मोठी उपलब्धी आहे. 

आचार्य तथा मुनी- महाराजांनी, समाजाच्या स्वास्थ्यासाठी आणि जैन समाजातील फूट टाळण्यासाठी, एका व्यासपीठावर येऊन नव्या पिढीला आदर्श ठरेल असे विधायक विचार मांडावेत; नाहीतर जेव्हढे त्यागी- तेव्हढ्या विचारांचे पंथ किंवा संप्रदाय निर्माण होतील आणि समाजाचे संघटन होण्याऐवजी, विघतनच होईल अशी भीती वाटते. 

वेगवेगळ्या राजकीय पक्षातील जैन आमदार वगैरे नेते मंडळी, मतभेद विसरून, जैन समाजातील ज्वलंत प्रश्न सोडवण्यासाठी आणि समाज स्वास्थ्यासाठी, जर एकाच व्यासपीठावर येतात आणि विचार- विनिमय करून, जैन समाज, धर्म, परंपरा, धर्मगुरू इ. साम्भंधी, धर्मसभेमध्ये आपले विधायक विचार मांडून ठोस निर्णय घेतात आणि त्याप्रमाणे समाजहिताचे मार्गदर्शन करतात; तर आर्ष परंपरा मननारे आणि न मानणारे असे सर्व जैन धर्मगुरू, एकाच विचारमंचावर येवून समाजस्वास्थ्य आणि धर्मरक्षणाचे विधायक स्वरूपाचे विचार का मांडत नाहीत ? अभिषेक- पूजा पद्धतीसबधी ज्या गावात किंवा भागात, पूर्वापार जी परंपरा चालू आहे; त्यामध्ये बदल करण्याचा अधिकार यांना कोणी दिला ? विशेषत: ग्रामीण भागातील जैन समाज, धर्माच्या बाबतील अत्यंत श्रद्धाळू असला; तरी खूप अज्ञानी आहे. मुनी-महाराज जे सांगतात, त्यावर हे लोक विश्वास ठेवतात; म्हणून समाजात धार्मिक आचार- विचारांच्या बाबतीत, फूट पाडणाऱ्या धर्म्गुरुनी, समाजातील भोळ्या भाबड्या श्रद्धाळू लोकांचा विश्वासघात 


 करण्याच पाप करू नये; अस आम्हाला वाटत.


तीर्थंकर भगवान हे पूजनीय आहेत, पद्मावती देवी हि वंदनीय आहे आणि आई- वडील व खरे गुरु हे सर्व आदरणीय आहेत; असे आपण सर्वांनी मानले आणि त्या प्रमाणे दैनंदिन जीवनात आचरण केले तर प्रश्नच मिटतो.
२० व्या शतकातील पहिले दिगंबर मुनी आणि प्रथम आचार्य म्हणून प.पू. १०८ श्री शांतीसागर महाराजांना संपूर्ण जैन समाज मानतो. गेल्या ३५० वर्षापासून खंडित झालेली दिगंबर मुनी परंपरा, २० व्या शतकात श्री शातीसागर महाराजांनी सुरु केली. खुद्द दिल्ली शहरातून अचार्यश्री विहार करताना, " तुम्हे नंगे स्थितीमे यहा सडकपर खुले आम घुमना मना है!" असे महाराजांना सांगून दिल्ली पोलिसांनी मज्जाव केला होता. तेंव्हा आचार्यश्रींनी  रस्त्याच्या मधेच पिंछीने थोडी जागा स्वच्छह केली आणि तिथच बैठक मारली आणि ध्यानाला बसले. दिल्लीची सर्व पोलिस व पुढारी मंडळी अचार्यश्रींच्या जवळ आली; महाराजांचं, जैन दिगंबर मुनींच्या आचारधर्मसम्भधीच म्हणन ऐकून घेतलं. त्यानंतर पोलिसांनी महाराजांना जैन मंदिरापर्यंत सन्मानन पोहोचवलं ! त्यावेळी महाराजांनी दिगम्बरावस्थेसाठी सत्याग्रह केला नसता; तर आज मुनीजनाना भारतभर विहार करणे कठीण झाले असते.


त्या अचार्यश्रीनीसुद्धा देवी पद्मावतीचा मन-सन्मान राखला आहे. ' यत्र नार्यस्तु पूज्यन्ते, रमन्ते तत्र देवता:' जिथ स्त्रीची पूजा केली जाते, तिथ देव्तासौधा रममाण होतात. स्त्री ही अबला नसून सबला आहे.' नारी को अबला न समजो नारी नर का खान !
उसीके कोकसे पैदा हुये महावीर भगवान !!
अशी हि भारतीय स्त्री महान आहे. मग महाराजांच्या आहाराच्यावेली, त्यांना पदघवून घेवून आहार देवू शकते, अष्टक करू शकते; मग ती स्त्री भगवंताचा अभिषेक का करू शकत नाही ? असे अनेक प्रश्न निर्माण होतात.

कर्नाटक राज्यातील हसन जिल्ह्यातील श्रवणबेल्गोल येथील, इंद्रागिरी पहाडावर ५८ फूट उंचीची गोम्तेश्वर भ. बहुबलींची, विशाल तथा मनोद्न्य मूर्ती इ.स.९८१ मध्ये "श्री चावुंडराजे करवियले ' त्या मूर्तीची प्रतीष्टपणा व पंचामृताचा पहिला अभिषेक एक हजार वर्षापूर्वी नेमिचान्द्रचार्यानी केला. तेव्हापासून आजपर्यंत भगवंतावर पंचामृत अभिषेकाची परंपरा अखंडपणे चालू आहे. हि धार्मिक परंपरा का मोडायची ? अशी पंचामृत अभिषेक परंपरा न मानणाऱ्या मुनींना कडाडून विरोध करण्यासाठी, मन-वाचन-कायेने तथा तन-मन-धनाने, आपण सर्वांनी खंभीरपने सज्ज राहिले पाहिजे; तरच धर्मसभेमध्ये टाळ्यांच्या गजरात सर्वानुमते मंजूर केलेल्या ठरावांची योग्यरीतीने ताबडतोब अंमलबजावणी होऊ शकेल. हीच या धर्मसभेची खरी फलश्रुती आहे.

धर्मसभेचे स्वागताध्यक्ष श्री. सुधाकर मणेरे, कार्याध्यक्ष श्री. रवींद्र देवमोरे, कार्यवाह श्री. चंद्रकांत पाटील आणि त्यांचे सर्व सहकारी समर्पक शब्दात सूत्रसंचालन करणारे श्री तीर्थंकर माणगावे, इचाल्कारांजीतील जिन मंदिराचे  सर्व पदाधिकारी या सर्वांनी समन्वय धर्मसभेचे अत्यंत उत्तमरीतीने आयोजन केले होते; यासाठी द. भा. जैन सभेचे चेअरमन प्रा. डी. ये. पाटील व मुख्यमहामंत्री श्री. सागर चौगुले यांचे उत्तम मार्गदर्शन व सहकार्य लाभले. त्याबद्दल आम्ही या सर्वाना मनापासून धन्यवाद देतो.

या धर्मसभेसाठी भारतवर्षीय दिगंबर जैन महासभेचे अध्यक्ष निर्मलकुमारजी सेठी (दिल्ली) भारतवर्षीय दिगंबर जैन तीर्थरक्षा समितीचे अध्यक्ष व द. भा. जैन सभेचे माजी अध्यक्ष आर. के. जैन (मुंबई), जैन धर्म व तत्वज्ञानाचे गाढे अभ्यासक व दिग्विजय पत्रिकेचे संपादक हेमान्तजी कला (इंदोर) द.भा. उपाध्याय समितीचे अध्यक्ष सुशीलकुमार उपाध्ये, अखिल भारतीय दिगंबर जैन महासमितीचे अध्यक्ष विजय जैन (लुहादिया), आमदार वीर्कुमार पाटील, आमदार अभय पाटील, आमदार संजय पाटील (बेलगाम) आमदार प्रकाश आवाडे, सर्वश्री राजेंद्र पाटील- याद्रवकर, सांगलीचे माजी महापौर सुरेश पाटील, शाम्नेवाडीचे अन्नासो खोत, द. भा. जैन सभेचे व्हा. चेअरमन रावसाहेब पाटील (बोरगाव) इ. नि परखडपणे आपले विचार मांडून, आर्ष परंपरेचाच पुरस्कार केला !

यशस्वीपणे सुसम्पन्न   झालेल्या धर्मसभेची सांगता करताना, अध्यक्षीय समारोपात श्री. आवाडे दादा म्हणाले, " समाजात विसंवादी सूर व्यक्त होऊ लागल्यावर, दोन वर्षापूर्वी बाहुबली येथे, मुक्त चिंतन शिबीर घेवून काही ठराव केले; पण त्याची योग्यरीतीने अंमलबजावणी झाली असती, तर सध्याची समस्या उद्भवली नसती. अभिषेक, पूजाविधी, प्रथा परंपरा याविरुद्ध बोलण्याचे प्रकार वाढत चालले आहेत, ही गोष्ट दक्षिण भारतातीलच नव्हे; तर उत्तर भातातील धर्मप्रेमिनाही मान्य होणारी नाही. असे धर्मसभेत स्पष्ट झाले आहे. या पर्म्प्रेपेक्षा वेगळी पूजाविधी वैयक्तिक स्वरुपात कोणास करावयाची असेल तर ते करू शकतात; पण समाजाच्या मंदिरात नाही. म्हणून यापुढील काळात जिनमंदिरात आर्ष परम्प्रेनुसारच पूजाविधी सुरु राहतील. आजची हि धर्मसभा या परंपरेचा पुरस्कार करण्यासाठीच सज्ज झाली आहे.

-----------------------------------------------------------------------------------------------------------
धर्मसभेत तालांच्या गजरात सर्वानुमते मंजूर झालेले ठराव ...
१. दक्षिण भारतामध्ये आर्ष परंपरेनुसार पंचामृत अभिषेक व पूजा पद्धती पूर्वापार प्रथेप्रमाणे, पूजेत महिलांचा सहभाग यापुढेही कायमस्वरूपी चालू राहील.
२. क्षेत्रपाल आणि यक्ष-याक्षिनिंचा, पूर्वीप्रमाणे चालणारा मानसन्मान यापुढेही कायमपणे होत राहील.
३. द. भा. जैन सभा व विविध संस्थांच्या पदाधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ, वादग्रस्त मुनीच्या गुरूकडे जावून, त्यांची सविस्तर माहिती देतील.
४. दिगंबर जैन मंदिरांच्या नावामध्ये वीसपंथी आम्नाय असा उल्लेख करून अशा विचारांच्याच व्यक्तींचा मंदिर कमिटीमध्ये समावेश राहील.
---------------------------------------------------------------------------------------------------------- 


                                                                                                                      प्राचार्य श्रीधर हेरवाडे

Thursday, August 19, 2010

Dakshin Bharat Jain Sabha's - Pragati Ani Jinvijay :: 13 august  2010 :: Issu 28 

शांतीसागर वाणी 

सहर्ष अणि संघर्ष

काही गोष्टी लोक अतिशय आनंदाने करीत असतात. तर काही गोष्टीसाठी संघर्षही करावा लागतो. आपल्या कार्यसिद्दीसाठी लोक विविध प्रकारे प्रयत्न करीत  असतात. कार्यातील अडथळे सहर्षपने स्वीकारणारे नेहमीच आनंदात असतात. खूपवेळा अनादिवृतीच कार्यपुर्तीसाठी कारणीभूत ठरत असते. सहर्षपाने झालेले आणि केलेले कार्य एकमेकात कटुता निर्माण करत नाही. भाविश्यातीन निर्विघ्न कार्यपुर्तीसाठी नेहमी सहर्ष सहयोग अथवा योगदान देणे हे प्रत्येकाच्या फायद्याचे ठरते. मित्र असो कि वैरी प्रत्येकाशी असणारा आपला व्यवहार हा हर्षयुक्तच असायला हवा. हर्षयुक्त व्यवहारामुळे नाती जपली जातात. संघर्ष्यामुळे नात्यात नेहमी दुरावाच निर्माण होतो. बिकट परिस्तिथी संघर्ष करणे याचा अर्थ सर्वाशी संघर्ष करणे असा होत नाही. प्रतिकूल परिस्थितीत आपली सभ्यता टिकवून ठेवून कार्य्पुर्तीची वात पाहणे म्हणजे परिस्थितीचा संघर्ष करणे होय. काही वेळा आपली वृत्ती संघर्षाची होवून बसते. अहंकाराची परिसीमा वाढली की, जीवन संघर्षमए  होऊ लागते. प्रत्येक गोष्टीत आणि प्रत्येकाशी संघर्ष सुरु होतो. संघर्ष्यातून आपुलकीचे घर्षण खूप झाल्यामुळे आपलेपणा निघून जातो. नंतर उरतो तो कोरडा व्यवहार. आपल्याला जितका संघर्ष टाळता येईल, तेवढा टाळावा. संघर्षामुळे  वातावरणात गरमपणा निर्माण होतो. हा गरमपणा माणुसकीचा ओलावा नाहीसा करणारा ठरतो. संघर्षातून जरी काही आपल्या स्वार्थाची पुरती झाली तरी जीवनातील हर्ष कमी झाल्यामुळे आपणास एकाकी होवून जगावे लागते. संघर्ष सोडून प्रत्येकाने सहर्षतेचा स्वीकार करायला शिकले पाहिजे. यामुळे सभोवती आल्हाददाइ वातावरणाची निर्मिती होऊ शकेल.
ब. ब्र. संजयजी गोपालकर
====================================================================

संपादकीय


भ. महावीर अध्यासन : एक सिहावलोकन

प्रात:स्मरणीय आचार्य कुन्द्कुन्दाचे एक खूप प्रसिद्ध वाचन आहे.- "नाणं नारस्स सारं !" अर्थात ज्ञान हेच मनुष्य जीवनाचे सार आहे. मग हे ज्ञान मिळवायचे कशासाठी असा प्रश्न उपस्थित होतो. आजकाल ज्ञान हे केवळ आर्थिक कामैसाठी, भरपूर पैसे मिलवून देणाऱ्या नोकरीच्या प्राप्तीसाठीच घ्यायचे असते असा पोटार्थी सिद्धांत रूढ झाला आहे. पण जैन तत्वज्ञान असे सांगते कि ज्ञान हे स्वताला अधिक उन्नत, अधिक उज्वल करून उत्तुन्गते पर्यंत पोहोचण्यासाठी प्राप्त करायचे असते. म्हणूनच ज्ञानप्राप्तीसाठी वयाचा अडसर मानला जात नाही. ज्ञानाचा आस्वाद घेवून स्वतः बरोबरच दुसर्याचे जीवनही प्रसंन्न, आनंदी आणि समृद्ध करावे हि अपेक्षाही काही गैर मानता येणार नाही. ज्ञानाची आणि ज्ञानार्जनाची हि सारी महती आता कथन करण्यास कारण घडले ते कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाच्या भ. महावीर अध्यासन केंद्राची !

अलीकडेच भ. महावीर अध्यासनाच्या समन्वयक दर. सौ. पद्मजा पाटील यांची भेट झाली. निमित्त होते ते " एम ए जैनालाजी" या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यापुढील अडचणीतून मार्ग काढण्यासाठी मा. कुलगुरूबरोबर आयोजित केलेल्या बैठकीचे स्वताची कौटुंबिक जबाबदारी समर्थपने पेलून, स्वताच्या विषयातील अध्यापनाचे नि संशोधनाचे व्याप सांभाळून पद्मजाताई ज्या निष्ठेने, ज्या द्यासाने नि क्रीयाशिलतेने अध्यासनाच्या "समन्वयका" ची भूमिका निभावत आहेत. त्याचे मनापासून कौतुकच करायला हवे. यामागे त्यांची स्वताची जैन साहित्य, जैन संस्कृती व जैन तत्वज्ञाना संबधीची ज्ञानलालसा हे जरी असले तरी ज्यातून आर्थिक फायदा काडीमात्र न होता शारीरिक व बौधीक्श्रम मात्र भरपूर होतात अशा कामासाठी वेळ देण्याची वृत्ती आजकाल आढळतेच कुठे ? नि आढळली तरी अपवादात्मकच असते, या निमित्ताने भ. महावीर अध्यासनाचे "शिहावलोकन" केले तर ते औचित्यपूर्ण ठरेल. एप्रिल २००१ ते एप्रिल २००२ हे भ. महावीरांचे २६०० वर्षे पूर्ण होणारे जयंती वर्ष साजरे झाले तेव्हा दक्षिण भारत जैन सभेने शिवाजी विद्यापीठात भ. महावीर अद्यासानाची स्थापना करण्याची मागणी केली. तेव्हा कुल्गुरुनी गठीत केलेल्या समितीने अध्यासन स्थापनेचा आराखडा तयार केले नि कुलगुरू प्रा. ताकवले यांनी शासनाकडे अध्यासन निर्मितीसाठी  आर्थिक मदतीचा प्रस्ताव पाठविला. तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुखांनी २५ एप्रिल २००२ च्या महावीर जन्मकल्यानक महोत्सवात ऑगस्ट क्रांती मैदानात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना हजारोंच्या उपस्थितीत भ. महावीर अध्यासनासाठी शासनाकडून २५ लाख रुपये मदत म्हणून देण्याची घोषणा केली व त्याप्रमाणे मे २००३ मध्ये २५ लाख रुपये मिळालेही. नंतर विद्यापीठीय औपचारिकता पूर्ण होऊन २००४ मध्ये म्यानेजमेंट
कौन्सिलच्या ठरावानुसार अध्यासनास मान्यता मिळाली व निधी संकलनाचे काम जोमाने चालू झाले. शासनाच्या २५ लाखामध्ये यु. जी. सी. चे. व देणगी रूपाने गोळा झालेले सर्व मिळून आता जवळपास २५ ते ५० लाख रुपयांचा निधी गोळा झाला तर अद्याप ५५ ते ६० लाख रुपयांची गरज अजूनही आहेच. प्रारंभी प्रोफ. आर. बी. पाटील, नंतर प्रोफ. बी. दि. खाणे यांनी समन्वयक म्हणून काम केले. या अध्यासनासाठी निधी गोळा करण्यात व शासनाकडून आर्थिक मदत मिळविण्यासाठी मा. कल्लाप्पांना आवाडे (दादा), प्रकाश आवाडे, प्रोफ. डी. ए. पाटील, माजी कुलगुरू प्रोफ. ताकवले, डॉ. सुभाषचंद्र अक्कोळे, प्राचार्य श्रीधर हेरवाडे यासारख्या ज्ञान तपस्व्यानी कित्येक दानशूर व्यक्तींना अध्यासानाला देणगी देण्यास प्रवृत्त कसे केले हे आम्ही अनुभवले आहे. कुलगुरू डॉक्टर माणिकराव साळुंखे यांच्या कारकिर्दीत अध्यासनाच्या कार्यास खर्या अर्थाने गती मिळाली. जेव्हा एक कोटीचे निधी संकलन पूर्णत्वास जाईल तेव्हा तिच्या व्याजातून भ. महावीर अध्यासनाचे कार्य निर्विघ्नपने शास्वत स्वरुपात चालेल याची ग्वाहीही डॉ.पद्मजा पाटील यांनी दिली. आजवर अध्यासनातर्फे " दखनच्या जैन विद्या संशोधनाचे प्रायाम, महाराष्ट्रातील जैन तीर्थक्षेत्रे - सामाजिक- आर्थिक- ऐतिहासिक अभ्यास" व संतकवी ब्रह्ममहतीसागर - साहित्यसमालोचन अशी चर्चासत्रे आयोजित केली गेली. " सल्लेखना" या विषयावरचे डी. ८ व ९ मार्चचे २ दिवसाचे चर्चासत्र केवळ अपूर्व असेच होते. सल्लेखनेविषयी सखोल चर्चा होवून सांगोपांग विचार अभ्यासकांनी मांडले. अध्यासानाकडून विद्वानांनी झालेली हि अत्यंत महत्वाची उपलब्धी होती. शिवाय अध्यासनातर्फे विद्यापीठात व अन्य ठिकाणी डॉ. जयकुमार उपाध्ये, नवी दिल्ली, क्रांतिकारी संत तरुणसागर महाराज, डॉ.उदिता शहा मुंबई, डॉ. व्ही. एम. धारूरकर, डॉ. वाचस्पती उपाध्याय नवी दिल्ली या विद्वान जैन साहित्तीकांची व्याखानेसुद्धा आयोजित केली गेली. एकंदरीत अद्यासनातर्फे भरीव काम झाले आहे- होत आहे.

जैन तत्वज्ञानात रुची असणार्यासाठी भ. महावीर अध्यासनातर्फे १) जैन तत्वज्ञान आणि प्राकृत हा सर्ठीफिकेठ  कोर्स (डिप्लोमा) व २) जैन तत्वज्ञान व प्राकृत पदवुत्तर पदविका (पी. जी. डिप्लोमा) हे एक वर्षाचे कोर्सेस चालवले जातात. यंदा "एम ए. जैनोलोजी आणि प्राकृत" हा अभ्यासक्रम चालू होतो आहे. त्यासाठी एकूण २५ विद्यार्त्याचा प्रवेश गरजेचा आहे. सध्या १४ - १५ विद्यार्थी तयार आहेत. बाकीचे हवे आहेत पण अनेकांना इछ्या असून फी ची आर्थिक अडचण मध्ये येते आहे. काही जन निकषामध्ये बसत नाहीत, पण यंदा हा २५ विद्यार्थ्यांचा जादुई आकडा पूर्ण करून "एम. ए." चा कोर्स चालू करण्याचा चंगच श्री. बाहुबली पाटील, श्री. अजित पाटील (वकील) प्रो. भगरे, प्रो. सौ. भगरे आदि मंडळीनी बांधला आहे. त्याला नक्कीच यश येईल असे वाटते. याबाबतीत मा. आवाडेदादांनी केलेली सूचना अमलात आणल्यास अनेक अडचणीवर मात करता येईल असे वाटते. ज्या विध्यार्थाना एम. ए. जैनालोजी करायचे आहे पण फी भरण्याची क्षमता नाही त्यांना सभेने स्कॉलरशिप फंडातून पैसे उपलब्ध करून दिल्यास खूप मोठे काम होईल. याचा विचार जरूर करावा असे आम्हाला वाटते. सायन्स, कॉमर्स, इंगीनीरिंग व अन्य शाखेच्या जीज्ञासुना "एम ए" करायचे असेल तर त्या अभ्यासक्रमासाठी पात्र होण्यासाठी त्यांनी आधी डिप्लोमा वा पी. जी. डिप्लोमा कोर्स केला तर त्यानाही अडमिशन मिळू शकेल व आपली ज्ञानाची भूक भागवता येईल. हे कोर्सेस करून नोकरी काही मिळवता येत नाही व अर्थार्जनाची उपलब्धी त्यातून निश्चित होत नाही हे वास्तव विसरून चालणार नाही. अन्यथा या कोर्सेससाठी विद्यार्थ्याच्या रांगा लागल्या असत्या. पण एक प्रमुख भारतीय धर्म म्हणून जैन धर्माने सार्या जगाचे लक्ष वेधून घेतलेले असताना व जैन साहित्य, जैन तत्वज्ञान, नीतिशास्त्र आधींच्या अभ्यासासाठी विपुल साहित्य उपलब्ध असताना आपण व आपला समाज त्यापासून वंचित राहणे म्हणजे  करंटेपणा ठरेल. हा करंटेपणा आपल्या वाटेला न येऊ देण्यासाठी भ. महावीर अध्यासनाचे कार्य व हे जैनाल्वाजीचे अभ्यासक्रम अखंडपणे व निर्विघ्नपने चालले पाहिजेत, नव्हे जैन समाजाचे ते कर्तव्यच आहे. याबाबतीत बेळगाव येथे दक्षिण भारत जैन सभेच्या ६२ व्या अधिवेशनात अध्यक्षपदावरून बोलताना २० व्या शतकातील थोर तत्वचिंतक डॉ.ए. एन. उपाध्ये यांनी ४० वर्षापूर्वी मांडलेले प्रखर वास्तव आम्हाला उद्गृत करावेसे वाटते. ते म्हणाले होते," जैन समाज हा श्रीमंत आहे अशी रूढ कल्पना असली तरी प्रत्क्ष्यात काही घराणीच श्रीमंत असून ती धार्मिक-सामाजिक-औधोगिक क्षेत्रात देशपातळीवर अभिमान वाटण्याजोगी अग्रेसर असली तरी तामिळनाडू, कर्नाटक, महाराष्ट्र येथे जी गरीब जैन जनता आहे त्यांच्या शैक्षणिक- धार्मिक- सामाजिक उन्नतीस हातभार लावणे हे संपूर्ण जैन समाजाचे कर्तव्य आहे !" आज ४० वर्षानंतरही हे वास्तव्य तितकेच प्रखर आहे याबद्दल कुणाचे दुमत नसावे.

या निमित्ताने भ. महावीर अध्यासनाचे "शिहाव्लोकन'  करताना ज्यांचे रूढार्थाने शिकण्याचे वय उलटून गेले तरीही, जैन तत्वज्ञान समजून घेण्याची चिकाटी, जिद्द जीवनिष्ठा असणारे बाहुबली पाटील यांच्यासारखे विद्यार्थी एम.ए. जैनालोजीचा अट्टाहास करतात. त्याबद्दल त्यांचे व त्यांच्या सहकार्यांचे अन्तःकरणपूर्वक अभिनंदनच केले पाहिजे. कारण या पदवीमुळे या मंडळीना नोकरी मिळण्याची शक्यता नाही वा असलेल्या नोकरीत पगारवाढही मिळणार नाही, पेन्शनही मिळणार नाही. पण हि सारी मंडळी समाज्याच्या अणुरेणूत स्पुर्ठीची बीजे पेरण्याचे काम निश्चितपने करणार आहेत हे विसरता कामा नाये. भ. महावीर अध्यासनाच्या माध्यमातून विद्यापीठाचे एक भव्य स्वताचा जागेतले "जैनालोजी रिसर्च सेंटर"  उभे राहावे जे सर्वार्थाने सुसज्ज असेल हे डॉ. पद्मजा पाटील यांचे स्वप्न "शिहावलोकन" करताना केवळ स्वप्नच राहू नये याची दक्षता भविष्यात घेतली पाहिजे. कारण सिंह मोठ्या ऐटीत - रुबाबात चालत असताना मागे बगत थांबत नाही तर नजर बदलून पुन्हा पुढची वाटचाल चालू करतो. सिहांची हि वृत्ती सिहाव्लोकन करताना विसरता कामा नये हि सदिछ्या मनी बाळगून "प्रगती" परिवार अध्यासनास व समस्त समाज्यास येत्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेछ्या सुद्धा देत आहे. 

डॉ.महावीर अक्कोळे

#########################################################

बातमी ........


दक्षिण भारत जैन सभेच्या अध्यक्षपदी  
रावसाहेब पाटिल (बोरगावकर) श्री रावसाहेब पाटिल यांचा सत्कार करताना विद्यमान अध्यक्ष आदरणीय श्री. काल्लाप्पांना आवाडे (दादा) सोबत जीवंधर चौगुले, प्रोफ. डी. ए. पाटील, सागर चौगुले, सुरेंद्र मिनचे (सावकार) आदि मान्यवर
------------------------------------------------------------------------------------------------------

दक्षिण भारत जैन सभेच्या सन २०१०-१३ या कालावधीकरिता अध्यक्ष म्हणून श्री. रावसाहेब पाटील (बोरगावकर) यांची एकमताने निवड झाली. सांगली येथे डी. ८ ऑगस्ट २०१० रोजी झालेल्या मद्यवरती कार्यकारी मंडळाच्या बैठकीत हा महत्वपूर्ण निर्णय झाला. सभेचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय श्री. काल्लाप्पाना आवाडे (दादा) यांच्या अध्यक्षतेखाली सदा बैठक संपन्न झाली.


श्री. रावसाहेब पाटील हे दक्षिण भारत जैन सभेचे गेली ८ वर्षे व्हा. चेअरमन म्हणून काम पाहत आहेत. बोरगाव येथील श्री अरिहंत क्रेडीट सौहार्द सहकारी ली. बोरगाव व अहिहंत उद्योग व शैक्षणिक संकुलाचे संस्थापक अध्यक्ष म्हणून त्यांनी भरीव कामगिरी केली आहे. विविध धार्मिक, सामाजिक व राजकीय क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमठविणारे श्री. रावसाहेब पाटील यांच्या या निवडीने सर्वत्र आनंद व समाधान व्यक्त होत आहे. विद्यमान अध्यक्ष श्री. काल्लाप्पांना आवाडे (दादा) यांनी पुढील कालावधीकरिता अध्यक्षपदासाठी श्री. रावसाहेब पाटील (बोरगावकर) यांचे नाव सुचविले. त्यास मुख्यमंत्री सागर चौगुले यांनी अनुमोदन दिले. त्यांच्या या निवडीबद्दल त्यांनी त्यांच्या पुढील कार्यास  दक्षिण भारत जैन सभा व परिवार तर्फे मनःपूर्वक हार्दिक शुभेछ्या !

#########################################################

Monday, July 26, 2010

Pragati Ani Jinvijay :: 23 july 2010 :: Issu 27  ( Dakshin Bharat Jain Sabha )


शांतिसागर वाणी 

युद्ध आणि बुद्ध

आकांक्षाची पुरती अथवा अन्याय दूर करण्यासाठी  कषाय तीव्रतेने जी गोष्ट केली जाते ती म्हणजे युद्ध. अनेक कारणासाठी युद्धे होत आली आहेत. युद्धाची प्रकार कोणतेही असो पण त्यात प्रामुख्याने राग-द्वेशांचेच प्राबल्य दिसून येते. कोणत्याही समश्याचा तोडगा युद्ध होऊ शकत नाही. युद्धात विजय जरी मिळवता आला तरी युद्धामुळे अनेक गोष्टी गमवाव्या लागतात हे निश्चित आहे. प्राचीन काळी युद्धात शस्त्रांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जायचा. आधुनिक युगात प्रगत शस्त्रास्त्रांचा कोणाचीच ओळख नसते. ती ज्यांचावर चालवली जातात त्यांचा ती घातच करतात. खूपवेळा युद्धाने अधोगतीच झालेली पाहायला मिळते. ज्याला शांतीचा मार्ग तत्वज्ञानाच्या आधारे सापडतो त्यांना बुद्ध म्हणतात. जेथे बुद्धाची शांती प्रस्तापित होते तेथे युद्धाचा अभाव होतो. युद्धाऐवजी बुद्धाचा विचार प्रत्येकवेळी झाला तर युद्धाचे प्रसंग येणारच नाही.

खूपवेळा शाब्दिक युद्धाने मोठ्या संग्रामाची सुरुवात होते. शब्दयुद्धाला ग्रामीण भाषेत भांडण म्हटले जाते. गैरसमजामुळे अथवा तीर्स्कारामुळे शाब्दिक युद्धाची सुरुवात होत असते. अशा भांडणात प्रखर शब्दांचे  प्रहार शस्त्रास्त्रांसारखे केले जातात. शब्दयुद्धात लोक खूपवेळा घायाळ होतात. त्यांच्या अंतर्मनातील जखमा लवकर भरून येत नाहीत. शब्दांच्या अस्त्राने झालेल्या जखमा सतत ताज्यातवान्या राहतात. भांडणाची भूमिका म्हणजेत युद्धाची भूमिका असते. कुरापतीखोर वृत्ती युद्धाची सुरुवात करण्यास कारणीभूत होऊ शकते. युद्धाचे प्रसंग टाळण्यासाठी आपण तत्वज्ञानाचा आधार घेतला पाहिजे. तत्वज्ञानाची संततधार ज्याच्या अंतकरणात सतत सुरु असते अशा व्यक्तीला बुद्ध्त्वाची प्राप्ती लवकर होत असते. जगातल्या प्रत्येकाला अशी बुद्ध्त्वाची प्राप्ती करून घेता येते. बुद्ध्त्वाची प्राप्ती झालेल्या शरीर्धारीला संसारिक दुखाचे चटके बसत नाहीत. प्रत्येकवेळी मनाप्रमाणे नाही घडले तर युद्धाला (भांडणाला) तत्पर होऊ नका. युद्धापेक्षा बुद्ध श्रेष्ठ आहे. लवकरात लवकर आपल्यातील बुद्ध जागृत करा. हा बुद्ध तुमच्या जीवनात नेहमीच शान्तिदुताचे कार्य करील.
बा. ब्रं. संजयजी गोपलकर


**************************************************************************

संपादकीय

पुण्यप्रेरक वर्षायोगाचे स्वागत

'आयुभांन्विर्ती शुभे प्रवृत्ती: व्रतमितीशते '
अशुभ कार्यापासून निवृत्त आणि शुभ कार्य करण्यासाठी प्रवृत्ती होणे, यालाच 'व्रताचरण' असे म्हणतात. आपल्या हातून अशुभ गोष्टी घडू नयेत - पापकर्म होऊ नये; वाईट घटना घडू नयेत, असे सर्वांनाच मनापासून वाटते. पण प्रत्यक्षात आचरण मात्र तसे घडत नाही. याउलट आपल्या हातून चांगल्या गोष्टी घडाव्यात - सत्कर्मे व्हावीत; पुण्य्वार्धक कार्य व्हावे, अशी सद्भावना सर्वांचीच असायला पाहिजे. या सदाचरनासाठी आणि पूजा अर्चा, उपास- तापास, वृत्त वैकल्ये, नोपी इ. धर्माचरनासाठी अत्यंत अनुकूल असा कालावधी, म्हणजे 'चातुर्मास' होय. या चातुर्मासाचे म्हणजेच वर्षायोगाचे आम्ही सश्रद्ध भावनेने स्वागत करतो! श्रावक-श्राविका व मुनी अर्यिका या चातुसंघाचा वर्षायोग, पुण्यप्रेरक होवो यासाठी सुभेछ्या देतो.

आषाड महिन्याच्या शुद्ध अष्टमी या दिवशी, श्रावक-श्राविकांचा अश्ठान्हिक पर्वारंभ म्हणजे चातुर्मासास आरंभ होतो. सर्व त्यागीगनांचा चातुर्मासारंभ, आषाढ शुद्ध चातुर्दासी म्हणजे अश्तान्हिक पर्व समाप्ती दिवसी होतो आणि अश्विन वद्य चादुर्दशी या दिवसी चातुर्मास संपतो. हा चार महिन्याचा कालावधी साधारणता: पावसाळ्यामध्ये येतो-वर्षा ऋतूत येतो; म्हणून याला वर्षायोग असेही म्हणतात.

श्रावक आणि त्यागीगन यांचे आचरण कसे असावे ? यासंबधी  रत्नकरंड श्रावकाचार, सागार धर्मामृत, अनगार धर्मामृत इ. धर्मग्रंथामध्ये आचार्यांनी सविस्तर सांगितले आहे.

साधू संताचा उपदेश ऐकणारे, सत्य-अहिन्सादी अनुव्रताचे काटेकोरपने पालन करणारे आणि सदैव शुभ कार्य करणाऱ्या श्रावक म्हणतात. देवपूजादी सत्कर्मे करणारा असा हा श्रावक श्रद्धावान असावा, विवेकाने वागवा आणि क्रियाशील असावा; परंतु असे चित्र समाजात दुर्मिळ दिसते; असे नाईलाजाने म्हणावे लागते.

इंद्रियविषय वासनावर विजय मिळविणारे, सर्व प्रकारच्या परीग्रहांचा त्याग करणारे आणि ज्ञानसाधना, ध्यान धारणा तथा इछ्या विरोधी तापामध्ये मग्न असणारे खरे तपस्वी साधू म्हणून ओळखले जातात. अशा तपस्वी मुनी-आर्यीकानी सत्य- अहिसाडी महाव्रतांचे अत्यंत काटेकोरपणे आचरण केले पाहिजे. कारण...

सर्व शास्त्रामध्ये आचार (आचरनच) श्रेष्ठ असल्याचे सांगितले आहे. म्हणूनच म्हणतात "आचार प्रथमो धर्म: ! आचार परमो धर्म: !' म्हणजे आचरण हा प्रथम धर्म आहे- सर्व श्रेष्ठ धर्म आहे."

या वर्षायोगामध्ये त्यागीगन आहार-विहारासाम्ब्धी काही नियम घेतात आणि व्रते धारण करतात. त्यांचे वास्तव्य एका ठिकाणी असते- दूरवरचा ते विहार करीत नाहीत. कारण पाउस पाणी, चिखल इ. मधून विहार केल्याने जीव हिंसा होते. अशी कोणत्याही प्रकारची हिंसा न झाल्याने 'अहिसा' या महाव्रताचे पालन त्यांच्या हातून होऊ शकते. एकाच गावात किंवा क्षेत्राच्या ठिकाणी त्यागीन्चा चातुर्मास असल्याने, रोज त्यांची धर्म प्रवचने होऊ शकतात. अशा प्रवचनातून अथवा धर्मोपदेशातून त्यांनी समाज जागृती करून, समाज संघटीत केला पाहिजे. समाजाचे तन-मन-धन हे सामाझीतासाठीच उपयोगात आणले पाहिजे. विशेषत: दानधर्माच्या रूपाने लक्षवधी रुपये मुनीच्या सांगण्यावरून भक्तजन देत असतात. त्या पैशातून गावोगावी पाठशाला निर्माण करव्यात, ज्यामुळे लहान मुलांवर धार्मिक तथा नैतिक संस्कार होतील. शिवाजी विद्यापीठ (कोल्हापूर) येथील "भ. महावीर अध्यासन केंद्र" याला मोठ्या प्रमाणात देणग्या देण्यासाठी मुनी महाराज यांनी आपल्या प्रवचनातून श्रावकांना प्रवृत्त करावे. कारण सादुसंतांच्या सांगण्यावर श्रावाकांची श्रद्धा असते. म्हणून ' दानं दुर्गती  नाशाय' यासाठी श्रावक श्राविका देणग्या देतात. त्यामुळे भ. महावीर अध्यासन केंद्रामधून जैन धर्म तत्वज्ञान, आचार-विचार, श्रमण-संस्कृती इ. संबंधी जैन विद्येचा सखोल अभ्यास व संशोधन होऊ शकेल. मंदिर, मूर्ती प्रतीष्टापना, पंचकल्यानिक तथा विविध आराधना महोत्सव इ. साठी जो पैसा खर्च होतो; त्या बरोबरच, "जैन विद्येचा सर्वांगीण विकास' यासाठीही देणग्या देण्याबाबतीत, आपल्या सर्व मुनीजनानी आणि प.पु. भट्टारकरत्न  स्वस्तिश्री लक्ष्मिसेन महास्वामी आणि प.पु. भट्टारक पट्टाचार्य जिनसेन  महास्वामी यांनी, आपल्या प्रव्चानामधून आग्रहाने श्रावक- श्राविकाना सांगितले पाहिजे. कारण कोल्हापूर, सांगली आणि बेळगाव या भागातील " जैन समाजाचा मानबिंदू म्हणजे भ. महावीर अध्यासन केंद्र' आहे. याचा सर्वांगीण विकास हे आपण सर्वांचेच ध्येय असले पाहिजे !
प्राचार्य श्रीधर हेरवाडे

**************************************************************************


विशेष संपादकीय

जैनहो सावधान 'नवाकाळ' सोकावतोय...

प्रगतीच्या वाचकांना शीर्षक वाचून कदाचित आश्चर्य वाटेल कि, जैनांनी सावधान होण्यासारखी काळासबंधी अशी आणखी कोणती गोष्ट घडली आहे ? नवाकाळ तर बदलत्या काळाचे स्वरूपच आहे. नव्या उगत, नव्या काळात बदल हे होणारच ! आज आम्ही बदलत्या कालासबंधी बोलत नाही कि धर्माचरण किती बदलले आहे म्हणून धर्मबुडी होईल यासबंधीही लिहित नाही. मुंबईमधून प्रसिद्ध होणाऱ्या "नवाकाळ" दैनिकात शनिवार दि. १९ जून २०१० रोजी पहिल्याच पानावर एक भडक संपादकीय प्रसिध्द झाले आहे. त्याचे शीर्षक आहे "जैनाची दादागिरी थांबवायलाच हवी" दैनिकाच्या संपादिका सौ. जयश्री खाडिलकर यांना बहुतेक जैनद्वेषाची कावीळ झाल्यामुळे त्यांनी सदर संपादकीयामध्ये जैनासबंधी गरळ ओकली आहे.

मुंबईमध्ये जैन लोक शाकाहाराचा प्रचार-प्रसार मोठ्या प्रमाणावर करत आहेत. त्यामुळे मांसाहारी लोकांना हॉटेल आणि बेकारीमध्येही शाकाहारीशिवाय इतर पदार्थ मिळेनासे झाले आहेत असे त्यांचे म्हणणे आहे. जैन पिझ्झा, जैन बर्गर, जैन वडापाव आणि इतर जैन पदार्थांचे वर्चस्व वाढल्यामुळे मांसाहारी लोकांची पंच्यात झाली आहे असे त्यांना वाटते. पैशाच्या जोरावर जैन लोक असा प्रचार करत असल्याचा साक्षात्कारही त्यांना झाला आहे. याशिवाय जैन लोक मुंबईमध्ये थैल्यांच्या जोरावर आपल्या फ्ल्याट जवळ मांसाहारीना प्रवेश देत नसल्याची त्यांची तक्रार आहे. फक्त शाकाहारींनाच फ्ल्याट देऊन जैन लोक पैशाच्या थैलीचे वजन ठेऊन भारताची घटना वाकवत असून शासन हे सर्व गप्पपने पाहत बसले आहे असा त्यांचा दावा आहे.

जगभर शाकाहाराचा प्रचार होत असताना जैनांचा शाकाहार पटण्यासारखा नाही असे का व्हावे ? अनेक प्रकारे शाकाहाराचे महत्व पटल्यामुळे अधिकाधिक  लोक शाकाहाराचा स्वीकार करत आहेत. नैरोबीसारख्या मांसाहारलोलपी लोकांच्यातही आता शाकाहाराची बीजे रुजू लागली आहेत. जगात फक्त जैन लोकच शाकाहार करतात असे नसून जैनेतर लोकांच्यातही शाकाहाराची जागृती वाढली आहे. डॉ. ये. पी. जे. अब्दुल कलाम यांच्यासारखे भारतीय माजी राष्ट्रपतीसुद्धा शाकाहाराचाच पुरस्कार करतात. भारतातल्या पंतप्रधानांना शाकाहारच आवडतो म्हणून खास त्यांच्यासाठी अमेरिकेतील राष्ट्रपती भवनात शाकाहारी भोजन बनविण्यात येते. ही एकविसाव्या शतकातील विशेष गोष्ट नाही काय ?  प्रत्येक शाकाहारीला आपल्या शेजारी आपल्यासारखाच शाकाहारी असावा असे वाटले तर त्यात कोणता गुन्हा आहे ? संपूर्ण जगभर शाकाहार,मांसाहार मिश्र व फक्त शाकाहार अशी भोजन व्यवस्था असणारी हॉटेल्स आहेतच. देश्यातील प्रत्येक हायवेवर नजर टाकली तर अधिकाधिक ठिकाणी ढाबेच ढाबे उभे राहिलेले दिसतात. अशा गोष्टीकडे डोळेझाक करून फक्त शाकाहारी जैनांची संख्या वाढत आहे म्हणून त्यांना टार्गेट करणे कितपत योग्य आहे ? बाजारात मागणी तसा पुरवठा होत असतो. हे संपादक महोदया पूर्णपणे वीसरलेल्या दिसतात. मुंबईत जर लोकांना मांसाहाराचीच आवड अधिक असती आणि लोकांनी त्याचीच  खरेदी करण्यासाठी गर्दी केली असती तर मांसाहारी दुकानाची संख्या आपोआपच वाढली असती. मुंबईत असणारी हॉटेल्स व बेक्ऱ्या केवळ जैनासाठीच उघडल्या आहेत काय ? याचाही विचार केला पाहिजे. केवळ एका धर्माच्या लोकासाठी अशी दुकाने असणे शक्यच नाही. जयश्री ताईनी शाकाहाराचे महत्व समजून घेतले तर साऱ्याच गोष्टींचा उलघडा त्यांना निश्चितच होईल. सात्विक आहार घेणारे जैन जर एकत्र राहण्यासाठी जैनानांच आपले शेजारी बनवत असतील तर त्यांच्या एकत्र राहण्याला साम्राज्याची उपमा कशी देता येईल. एखाद्या हिंदू संताने मराठा तितुका मिळवावा असे म्हंटले तर ते संतवचन होते. त्याला अन्यायाचा वास येत नाही. मात्र जैन लोक शेजारी शेजारी राहिले तर ते इतरांच्यावर अन्यायकारक होऊ शकेल काय ? आम्हाला तर असे वाटते कि, जैनांनी नेहमी जैनांच्या शेजारी राहावे. अशा एकत्रित राहण्यामुळे जैन संस्कृती टिकून राहील. जैन संस्कृतीचा विकास होईल. इतर लोकांच्यात  राहण्याने आपल्या मुलाबालावर जैनत्वाचे संस्कार होऊ शकत नाहीत. अशा मुलांच्या मनात जैन धर्माबद्दल अधिक प्रमाणात आस्था उत्पन्न होऊ शकत नाही. 

जैनांची अनेक कुटुंबे धंदा, व्यवसाय किंवा नोकरीच्या निमित्ताने अनेकठिकाणी विखुरलेली आहेत. खूपवेळा अशा कुटुंबाना परिस्थितीनुरूप जमवून  घ्यावे लागते. अशावेळी मुलांच्यावर सुयोग्य संस्कार होऊ शकत नाहीत. मांसाहारी कुटुंम्बांच्यात या मुलांची सतत ये-जा सुरु राहिली की, अशा मुलांना पुढे मांसाहाराचा विधीनिशेद रहात नाही. बहुजन समाजात वावरायला, व्यवसाय करायला, नोकरी-चाकरी करायला आमचा मुळीच विरोध नाही. पण राहणे आणि भोजन यासारख्या गोष्टी मात्र बहुजन समाजात होऊ नयेत असे आम्हाला
वाटते.

नवाकाळ म्हणतो, जैनांची श्रीमंती मुंबईकरांच्या मुळावर उठली आहे. पण आम्हास तर असे वाटते जैनांच्याकडे पैश्याच्या श्रीमंतीबरोबरच मनाचीही श्रीमंती खूप मोठी आहे. जैन लोकांची दानत खूप मोठी आहे. जैन लोकांनी चालविलेल्या सामाजिक संस्था अधिक कार्यक्षम दिसून येतात. जैन लोकच देशात सर्वाधिक ट्याक्स भरतात. यामुळेच आपल्या सर्वांचा विकास समतोल प्रमाणात होताना दिसतो. मुंबई गर्भश्रीमंत जैनांच्या मुठीत चाललेली आहे असा जो गैरसमज खाडिलकर ताईंचा झाला आहे तो त्यांनी दुरुस्त करून घ्यावा. मुंबईत जैनांच्याबरोबरच अनेक गर्भश्रीमंत लोक आहेत, ते सुद्धा मुंबईत जागा खरेदी करत आहेतच. मग त्यांना कोणी गैर मनात नाही. जैन समाज, जैन देवता, जैन शास्त्र, जैन साधू आणि जैन संदेश- उपदेश याबद्दल जैनेतर लोकात खूपच भ्रामक समजुती निर्माण होत आहेत. खेड्यातील लोकांनी या गोष्टी जशाच्यातश्या अनुभवलेल्या असल्यामुळे सर्व समाज खेड्यात गुण्यागोविंदाने नांदत असतो. पण शहरी लोकामधील काही भ्रमिष्ठ लोकांना याचा अभ्यास नसल्याने समाजात अकारण कटुता निर्माण होते. जैन समाजाने स्वातंत्र्यप्राप्तीपासून आजपर्यंत राष्ट्रविकासात मौलिक भूमिका बजावली आहे. कृषी क्षेत्र असो की व्यावसाईक क्षेत्र असो सर्वच क्षेत्रात उतुंग कामगिरी करून देशवासियांना अधिकाधिक विकसित करण्याचा प्रयत्न केला आहे. जैन धर्मातील अहिंसा, सत्य, अपरिग्रह या तत्वांचा प्रभाव गांधीजींच्या मनावर झाला आणि त्यांनी अहिंसक लढा लढून भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले. जैन समाजात आणि इतर समाजात असणारी गुन्हेगारी पाहीली तर सहज लक्षात येईल की जैन समाज अधिकाधिक निष्कलंक जीवन जगतो. जैन समाजाला सामाजिक शांततेचे भान असल्याने आजपर्यंत त्यांच्यावर राजकीय स्वरूपाचे कितीही अन्याय झाले तरी तो रस्त्यावर उतरला नाही. जैनांनी आजपर्यंत दंगल, जाळपोळ केल्याचे एकही उदाहरण नाही. जैन समाज हिंसक वृत्तीचा नाही त्यामुळे जैनांच्या विरोधात कोणतेही राजकारण होवू नये. अहिंसेचा पुजारी आणि सत्याची कास धरणारा जैन समाज अध्यात्मिक क्षेत्रात आपला ठसा उमठ्वून सर्वोच्च शिखरावर बसला आहे. अशा शांतताप्रिय समाजाला कोणी कोणत्याही वादाच्या भोवऱ्यात अडकवू नये.

जैनहो, आपण जर वेळीच सावध झालो नाही तर येणारा काल आपल्याला कलंकित केल्याशिवाय राहणार नाही. नव्या काळाची पाऊले वेळीच ओळखून जैन जैनेतर अशी विभागणी करण्याच्या नावावर जैनांचे खच्चीकरण केले जावू शकते. नव्या काळासोबत जाणारे आमचे जैन बांधव जर समाजापासून विखरून दूर राहिले तर आपले जैनत्व कमी होण्याचा किंवा नाहीसे होण्याचा धोका वाढणार आहे. केवळ जैनद्वेशातून भडक लिखाण करून अहिंसक जैनांना बदनाम करण्याचा चालविलेला प्रयत्न वेळीच थांबवायला हवा. जैनहो तुम्ही नव्या काळाबरोबर चालताना तीर्थकरांचा जुना काल आणि पुर्वज्यांचा जुना काळ विसरून चालणार नाही. हे लक्षात ठेवा.
ब. ब्रं. संजयजी गोपलकर